महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । देशभरात २००१ मध्ये धुमाकूळ घातलेल्या गदर : एक प्रेमकथा (Gadar: Ek prem katha) हा चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित होत आहे. तारासिंग आणि सकीना मेमसाब यांच्या हिंदुस्तान-पाकिस्तान प्रेमाची कथा आणि फाळणीवर आधारीत हा चित्रपट सुपरहीट होता. आता, तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करत याचा मोशन पोस्टर रिलिज करण्यात आला होता. आता, अभिनेत्री अमिषा पटेलने या चित्रपटाच्या शुटींगचा एक फोटो इंस्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
गदर चित्रपटाच्या सिक्वलमध्येही सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल यांची सुपरहीट जोडी दिसणार आहे. सोबतच, उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) हेही मुख्य भूमिकेत आहेत. सोशल मीडियावर गदर 2 चित्रपटातील शुटींगच्या सेटवरील एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पगडी बांधून सनी देओल दिसत आहे. तर, ऑरेंज कलरच्या पंजाबी ड्रेसमध्ये सकीना म्हणजे अमिषा पटेल दिसून येते. हा फोटो पाहून अनेकांनी गदर चित्रपटाच्या आठवणी जागवल्या आहेत. तसेच, नेटीझन्सने चित्रपटाची उत्सुकता असल्याच्या कमेंटही केल्या आहेत.
https://www.instagram.com/ameeshapatel9/?utm_source=ig_embed&ig_rid=f5590d4f-c957-4d70-88ce-6bcb363d0809
गदर एक प्रेम कथा या चित्रपटात “पाकिस्तानला रिक्रिएट करण्यात आले होते. यापूर्वी चित्रपटामध्ये असा प्रकार कधीच घडला नव्हता. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणे सुपरहीट झाल्याने चित्रपटानेही बॉक्स ऑफिसरवर मोठा गल्ला जमवला होता. सनी देओलच्या पहाडी आवाजात, हिंदुस्तान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा… या डायलॉगने थेअरटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत होता. अनेकांनी सिनेमागृहात दोन-तीनवेळा जाऊन हा चित्रपट पाहिला होता.