ओमायक्रॉन ; आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर, हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक 15 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र एविएशन रेगुलेटर डीजीसीएने म्हटले आहे की, 15 डिसेंबरपर्यंत आम्ही आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता 15 डिसेंबरनंतरही आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी कायम राहील. कोरोच्या नव्या व्हेरिएंटमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, नवीन तारीख लवकरच घोषित करण्यात येईल. असे डीजीसीएच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 नोव्हेंबरला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर बैठक घेतली होती. त्यात 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विदेशी नागरिकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानानी हा निर्णय घेतला होता.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभराची चिंता वाढवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती.

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारदेखील सर्तक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सोबतच सात दिवस विलगीकरणात स्वखर्चाने राहावे लागणार आहे. प्रवाशांसाठी काही हॉटेल महानगर पालिकेने निवडले असून, तिथे प्रवाशी राहू शकतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *