महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ डिसेंबर । आयपीएल २०२२ पूर्वी जुन्या ८ फ्रँचायझींनी कायम (रिटेन) ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आता सर्व फ्रँचायझींचे लक्ष्य मोठा लिलाव प्रक्रियेवर आहे. बंगळुरू, कोलकाता व पंजाबला नव्या कर्णधाराची आवश्यकता असून २ नव्या फ्रँचायझीही कर्णधार शोधात आहेत. लिलावापूर्वी त्यांना काही नावे रिटेन करण्याची संधी असेल. लिलावात ८ संघांची रणनीती काय असेल, हे आपण पाहूयात…
मुंबई इंडियन्स : फ्रँचायझीने आपली ४ मोठी नावे रिटेन केली आहेत. त्यांना मधल्या फळीतील चांगल्या फलंदाजासह विदेशी वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांची गरज आहे. फलंदाजीत त्याच्याकडे गिल, इशान, पराग आणि श्रेयस अय्यर यांच्यासह फिरकीमध्ये बिश्नोई, चहल, चहर यांचा पर्याय असेल. विदेशी वेगवान गोलंदाजांवर मुंबई नेहमीच विश्वास दाखवते.
चेन्नई सुपरकिंग्ज : चेन्नईने एकही वेगवान गोलंदाज रिटेन केला नाही. ते शार्दुल, दीपक व हेजलवूडला खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच त्यांचे नवीन खेळाडूंकडे लक्ष असेल. गेल्या सत्रात त्याची मधली फळी अपयशी ठरली होती. ते मार्कराम, बेअरस्टो आणि कॉन्वेला खरेदी करण्यासाठी पुढे असतील.
रॉयल चँलेंजर्स बंगळुरू : संघाला कर्णधाराची गरज आहे. त्यांच्याकडे राहुल, अय्यर व वॉर्नरचा पर्याय आहे. ते पुन्हा एकदा नवदीप सैनी व हर्षल पटेलला खरेदीचा प्रयत्न करतील. डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर मधल्या फळीत भरवशाच्या फलंदाजाची गरज आहे. ते मनीष पांडे किंवा नितीश राणा लक्ष्य ठेवून आहेत. चहलला पुन्हा खरेदी करण्यासाठी संघ मोठी बोलू लावू शकतो.
सनरायझर्स हैदराबाद : विल्यमसनसह संघाने दोन अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन केले. त्यांना पुन्हा एकदा संपूर्ण संघ तयार करावा लागेल. ते मोठे भारतीय खेळाडू विकत घेण्याचा प्रयत्न करतील. हार्दिक पांड्यासह दिनेश कार्तिक आणि अश्विनवर त्याची नजर असेल. वेगवान गोलंदाजीत संघ भुवनेश्वर आणि नटराजनला पुन्हा सामील करू इच्छितो.
पंजाब किंग्ज : राहुल रिटेन न झाल्यास, त्यांना कर्णधाराची अवश्यकता भासेल. मॉर्गन किंवा वॉर्नरसारखा खेळाडू मिळवण्याचा पंजाबचा प्रयत्न करेल, जो संघाला भविष्यासाठी तयार करू शकेल. पंजाब धवनवरही विश्वास दाखवू शकतो. मधली फळी ही त्यांच्यासाठी मोठी समस्या नाही, अय्यरसारखा खेळाडू कर्णधारपद आणि मधल्या फळी हे दोन्ही प्रश्न संपवू शकतो.
राजस्थान रॉयल्स : संघाने आपल्या तीन प्रमुख खेळाडूंना रिटेन केले. लिलावात त्याचे मुख्य लक्ष्य गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंवर असेल. संघ पुन्हा एकदा स्टोक्सला सोबत घेऊ इच्छितो. गोलंदाजीत फर्ग्युसन, बोल्ट आणि कमिन्सवर डाव खेळू शकतो. त्याच्यासाठी कृणाल पांड्याही चांगला पर्याय ठरेल.
दिल्ली कॅपिटल्स : संघाने आपले संतुलन कायम ठेवले आहे. आता त्यांना चांगल्या परदेशी खेळाडूंची गरज आहे. संघ वॉर्नर आणि मार्शला खरेदी करण्यात रस दाखवू शकतो. नोर्तजेला साथीला संघ भारताच्या युवा वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवू शकतो. अक्षरच्या जोडीला भारतीय फिरकीपटूची गरज भासेल.
कोलकाता नाइटरायझर्स : फ्रँचायझीने रिटेन्शनमध्ये कामगिरीपेक्षा नावाला अधिक महत्त्व दिले आहे. लिलावात संघाला आधी कर्णधार विकत घ्यायचा आहे. त्यांना वेगवान गोलंदाजही पाहिजे.
धोनीने जडेजाला नंबर-१ रिटेन खेळाडू बनवले
चेन्नईने लिलावापूर्वी ४ खेळाडूंना रिटेन केले. रवींद्र जडेजा हा संघाचा पहिला व कर्णधार धोनी दुसरा रिटेन खेळाडू आहे. जडेजाला १६ व धोनीला १२ कोटी रुपये मिळतील. संघाचे प्रशिक्षक एल. बालाजीने म्हटले की, ‘माही भाईने स्वतः जडेजाला नंबर-१ रिटेन खेळाडूचा टॅग दिला. हा त्यांचा निर्णय आहे. त्याला संघाची गरज माहिती आहे. तो नेहमीच आमचा कर्णधार असेल.’
खेळाडू 2021 वेतन 2022 वेतन वाढ
व्यंकटेश अय्यर 20 लाख 8 कोटी 3900% उमरान मलिक 10 लाख 4 कोटी 3900% ऋतुराज गायकवाड 20 लाख 6 कोटी 2900% अब्दुल समद 20 लाख 4 कोटी 1900% अर्शदीप सिंग 20 लाख 4 कोटी 1900% एनरिच नोर्तजे 50 लाख 6.5 कोटी 1200% मयंक अग्रवाल 1 कोटी 12 कोटी 1100% केन विल्यम्सन 3 कोटी 14 कोटी 366% पृथ्वी शॉ 1.2 कोटी 7.5 कोटी 525%