महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल- अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ डिसेंबर । महाराष्ट्रात येणाऱ्यांना प्रत्येकाला आता कोरोनाचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. कोरोनाच्या नियमावलीत काही प्रमाणात तफावत होती. मात्र आता सर्व नियम एकसारखे पाहिजेत. त्यामुळे आता भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आले तर त्यांच्यासाठी नियम सारखेच असावेत, यासाठी नियमावलीत बदल करण्यात आलेले आहेत.

इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट दाखवावाच लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात येताना देखील रिपोर्ट दाखवावा लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतलेली बरी, असे अजित पवार म्हणाले. ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत.

राष्ट्रीय नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी बोलायची गरज नाही, असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमपीएससीतील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती देखील अजित दादांनी दिली.

पुढे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी, मुंबईच्या महापौरांनी, देशपातळीवर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे नियम बदलण्यात आलेले आहेत. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन टास्क फोर्ससोबत बैठक करुन निर्णय घेऊ. असे पवार म्हणाले.

शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा केली
कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ञ कोरोनाच्या या व्हेरिएंटबद्दल अनेक वक्तव्य केले आहे. त्यासंबधी शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *