भाजपचा उलटलेला डाव भाजपचं केंद्रीय नेतृत्व अजून विसरले नाही ; अमित शाहांचं सावध पवित्रा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ नवी दिल्‍ली :मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य समर्थक 21 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. आता मध्य प्रदेशातलं कमलनाथ सरकार अल्पमतात आहे. ज्योतिरादित्य यांनी अधिकृतपणे पक्षात केला तरी अद्याप मध्य प्रदेशातल्या भाजपने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. आपल्याकडे किती आमदार असा आकडाही जाहीर केलेला नाही. महाराष्ट्रात फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर उलटलेला डाव भाजपचं केंद्रीय नेतृत्व अद्याप विसरलेलं नाही हे यातून स्पष्ट होतं.

नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात कुठल्याच एका पक्षाला बहुमत नव्हतं त्या वेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी काही आमदार आपल्या पाठिशी आहेत, असा दावा करत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी केली. या पाठिंब्यावर रात्रीत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आणि शपथविधीही झाला. पण अजित पवार यांनी दावा केला, तेवढे आमदार काही भाजपला येऊन मिळाले नाहीत.

मध्य प्रदेशातले काँग्रेस आमदार गायब आहेत, तसे त्या वेळी राष्ट्रवादीचे काही आमदारी गायब होते. पण अखेर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी या आमदारांचं मन वळवत त्यांना भाजपकडे जाण्यावाचून रोखलं आणि अजित पवार एकटे पडले. ते आवश्यक आमदारांचं बळ देऊ शकले नाहीत आणि भाजप सरकार अवघ्या दोन दिवसात कोसळलं. हा धोका आता मध्य प्रदेश भाजप पत्करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे सत्तास्थापनेची कोणतीही घाई ते करताना दिसत नाहीत.

दुसरीकडे मुख्यमंत्री कमलनाथ मात्र ‘गायब झालेले आमदार संपर्कात आहेत. शिवाय भाजपचे काही आमदारही संपर्कात असल्याचा’ दावा करत काँग्रेस सरकार पडणार नाही, असं ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशात आता काय घडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कसे असू शकते सत्तेचं गणित ? मध्य प्रदेश विधानसभेत सद्यस्थितीत बहुमतासाठी 115 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या 22 आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता हे गणित बदलणार आहे. काँग्रेस आघाडीचं संख्याबळ 99 वर येणार आहे. भाजपला 107 जागा मिळाल्या आहेत. आता 22 आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर 206 आमदारांचीच विधानसभा राहील. त्यामुळे बहुमताचा आकडा 104 वर येईल. भाजपकडे 107 आमदार आहेत. म्हणजेच सहज ते बहुमत चाचणी पार पाडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *