आणखी एका बँकेवर आर.बी.आय. ची टांगती तलवार? ग्राहक चिंतेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – मुंबई : Yes Bank वर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर देशभर खळबळ उडाली होती. कारण पंजाब नॅशनल बँकेचं प्रकरण अजुनही मिटलेलं नाही. त्या बँकेत लाखो ग्राहकांचे पैसे अडकले आहेत. त्यानंतर येस बँकेचं प्रकरण घडलं त्यामुळे बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात आणखी एका बँकेविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या येत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला असून घाबरण्याचं कारण नाही. सगळ्या अफवा आहेत. बँकेची परिस्थिती चांगली असल्याचा खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर कर्नाटक बँकेविषयी काही बातम्या आल्याने ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली होती. या बँकेवरही आरबीआय निर्बंध लादणार असल्याचं म्हटलं जात असल्याने ग्राहक चिंतेत होते. या बँकेच्या देशभारत शाखा आहेत. सोशल मीडियावरून या बातम्या येताच बँकेकडून खुलासा करण्यात आला आहे. कर्नाटक बँकेचे मुख्याधिकारी महाबळेश्वर एम. एस. यांनी खुलासा केलाय. अफेवर विश्वास ठेवू नका. बँकेची परिस्थिती मजबूत आहे. बँकेकडे पुरेसे पैसे आहेत असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईच्या विशेष कोर्टाने येस बँकेचे (Yes Bank) संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत प्रवर्तन संचालनालयाकडे (ईडी) कोठडी सुनावली आहे. ईडीने रविवारी पहाटे राणा कपूरला अटक केली. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली आणि आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शनिवारी ईडीने राणा कपूर यांची वरीळीतील समुद्रमहाल निवासस्थानी चौकशी सुरू होती. येस बँकेच्या प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे.

भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या डीएचएफएलने बँकेने दिलेल्या 4,450 कोटी रुपयांसाठी कंपनीला पैसे दिले, ज्याची चौकशी सुरू होती. ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येस बँकेनं डीएचएफएलला 3,750 कोटी रुपये आणि डीएचएफएलच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना 750 कोटींचे कर्ज दिलं आहे. शुक्रवारी बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापे मारण्यात आले होते. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले होते. ईडीने राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले. डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *