‘कोरोना’मुळे शेअर बाजारात मोठी घसरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – मुंबई  : कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार पसरला असताना व्यावसायासोबतच शेअर मार्केवरही मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये घसरण होत आहे. आज सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी घसरला असून निफ्टी 700 अंकानी घसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील  चिंता वाढत आहे. बाजार सुरू होताच सेन्सेक्स मोठ्या म्हणजे तब्बल 1600 अंकानी गडगडला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही 470 अंकाची घसरण झाली आहे.

अमेरिकेतील बाजाराताही कोरोनाची भीती आहे. कालच्या बाजारात Dow 1460 अंकांनी घसरला होता. Nasdaq आणि S&P 500 ही 5 टक्क्यांपर्यंत घसरला. मार्च 2017 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजाराच्या खाली आला आहे. 40 हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये 33 हजारापर्यंत घसरण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *