महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । स्टॉक मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesj Jhunjhunwala) यांच्या नावाचा स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या आयपीओला फायदा मिळू शकला नाही. 7249 कोटी रुपयांचा IPO फक्त 79 टक्क्यांनी सबस्क्राईब होऊ शकला. असे मानले जाते की महागड्या मूल्यांकनामुळे (High Valuation) गुंतवणूकदारांनी या IPO पासून स्वतःला दूर ठेवलले.स्टार हेल्थ त्याच्या आयपीओ संदर्भात (Star Health IPO) एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की सबस्क्रिप्शन कालावधीत IPO ला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने स्टार हेल्थ ऑफर फॉर सेलचा हिस्सा कमी करेल. इश्यू 30 नोव्हेंबर रोजी उघडला आणि 2 डिसेंबर रोजी बंद झाला आहे.
देशातील सर्वात मोठ्या खाजगी विमा (Private Insurance Company) कंपनीचा IPO गुरूवारी सबस्क्रिप्शन बंद होईपर्यंत पूर्णपणे सबस्क्राईब झाला नव्हता, ज्यामुळे भारतातील IPO मागणी कमी होण्याची शक्यता आहे.इश्यूच्या सबस्क्रिप्शन कालावधी वाढवूनही, IPO फक्त 79 टक्के सबस्क्राईब झाला असून 427.37 मिलियन डॉलर बोली मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, रिटेल आणि इन्स्टिट्युशनल पोर्शन पूर्णपणे सबस्क्राईब झाला होता. परंतु हे HNIs किंवा नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांसाठी असे नव्हते.
HNIs कडून थंड प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे सुमारे 100 मिलियन डॉलरची घट झाली आहे. यामुळे, OFS ची साईज अंडरसबस्क्रिप्शन पोर्शनपर्यंत कमी केली जाईल. मात्र स्टार हेल्थने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. इन्स्टिट्युशनल इनवेस्टर्स पोर्शन 1.03 पट आणि रिटेल सेगमेंट 1.1 पट वर पूर्ण सबस्क्राईब करण्यात आला. मात्र Nykaa सारख्या इतर IPO प्रमाणे याला प्रतिसाद मिळाला नाही.