स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; वाचा महत्वपुर्ण निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ डिसेंबर । सातारा (satara) जिल्ह्यात एक आणि दाेन डिसेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे (rain) सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी (strawberry) व द्राक्ष (grapes) या पिकांचा समावेश आहे. loss of strawberry & grapes frams uncertain rain in mahableshwar panchgani satara

अवकाळी पावसामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी तातडीने दखल घेवून कृषी विभागाशी चर्चा केली. या चर्चेतून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना आत्मा योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून शेतकऱ्यांना तातडीने पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी दिली आहे.

पहिल्या टप्यात उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील सुमारे ३५० एकर क्षेत्रावर पीक संरक्षण औषधे पुरवठा करण्यास मंजूरी मिळाली आहे. उर्वरीत क्षेत्रासाठी तातडीने निधीची मागणी करावी अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कृषी विभागास दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *