Good News! या विमान कंपनीकडून प्रवाशांना भेट ; आता फक्त 1400 रुपयात विमानानं प्रवास करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । आता देशातील सुंदर ठिकाणांना भेट देण्यासाठी जास्त विचार करू नका. फक्त वेळ काढा आणि यासाठी पैसे तयार ठेवा. तुम्हाला देशातील सर्वात सुंदर ठिकाणी स्वस्तात प्रवास करायचा असेल, तर इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी उत्तम ऑफर आणली आहे. आता विमानाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे आणि स्वस्त होणार आहे. कारण विमान कंपनी इंडिगोने अनेक नवीन उड्डाणांची घोषणा केली आहे. यावर इंडिगोने म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या प्रवाशांसाठी पॉइंट टू पॉइंट कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. 

इंडिगोकडून ट्विटवरुन माहिती
इंडिगोने अधिकृतपणे ट्विट करून आपल्या ग्राहकांना सांगितले की, ‘थेट कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास अधिक सोपा होईल आणि पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अनोखा अनुभव मिळेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यातही सोयीचे होईल.

याआधी, इंडिगोने 2 नोव्हेंबर 2021 पासून शिलाँग आणि दिब्रुगड दरम्यान थेट उड्डाण सुरू केले आहे. त्याचे सुरुवातीचे भाडे फक्त 1400 रुपये आहे.

बुकिंग कसे करायचे?
तुम्हालाही स्वस्तात प्रवास करायचा असेल, तर इंडिगोच्या वेबसाइटवर जाऊन सविस्तर माहिती मिळवू शकता. याशिवाय प्रवासी एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट https://www.goindigo.in/ वर जाऊन इंडिगो फ्लाइटचे तिकीट बुक करू शकतात.

12 तासांचा प्रवास 75 मिनिटांत
वाहतुकीचे कोणतेही थेट साधन उपलब्ध नसल्यामुळे, शिलाँग आणि दिब्रुगड दरम्यान प्रवास करण्यासाठी लोकांना रस्ता आणि ट्रेनने 12 तासांचा लांब प्रवास करावा लागला. पण आता फक्त 75 मिनिटांच्या फ्लाइटची निवड करून, दोन शहरांदरम्यान सहज उड्डाण करता येईल.

जाणून घ्या कोणत्या शहरात किती भाडं असेल?
जम्मू ते लेह – रु. 1854
लेह ते जम्मू – रु. 2946
इंदूर ते जोधपूर – रु. 2695
जोधपूर ते इंदूर – रु. 2735
प्रयागराज ते इंदूर – रु. 3429
इंदूर ते प्रयागराज – रु. 3637
लखनऊ ते नागपूर – रु. 3473
नागपूर ते लखनऊ – रु. 3473

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *