महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ डिसेंबर । Australia vs England Ashes Series: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित Ashes Series अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 5 सामन्यांची ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाच्या मैदानात रंगणार आहे. 8 डिसेंबर पासून ब्रिस्बेनच्या गाबाच्या मैदानातून मालिकेला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यासाठी तीन दिवस बाकी असताना ऑस्ट्रेलियन संघाने Playing 11 ची घोषणा केलीये. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ चार प्रमुख गोलंदाजानिशी मैदानात उतरेल.
पॅट कमिन्सने संघात 6 फलंदाजांना स्थान देण्याला पसंती दिलीये. यात सलामीवीर मार्कस हॅरिस आणि डेव्हिड वॉर्नर यांचा समावेश आहे. मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड आणि यष्टीरक्षक फलंदाज एलेक्स कॅरी यांच्यावर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. जलदगती अष्टपैलू गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाने कॅमरून ग्रीनला संधी दिलीये.
गाबा टेस्टसाठी ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन
मार्कस हॅरिस, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक ), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेजलवुड.
मालिकेसाठी दोन्ही संघ
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव स्मिथ (उप-कर्णधार), मार्कस हॅरिस, डेविड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, ट्रेविस हेड, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक ), कॅमरून ग्रीन, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, मायकल नेसेर, जाये रिचर्ड्सन आणि मिचेल स्वेप्सन.
इंग्लंड: जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोनाथन बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राउली, हसीब अहमद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओवर्टन, ओली पोप, ओली रोबिन्सन, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स आणि मार्क वूड.
हेही वाचा: वानखेडेच्या मैदानात एजाजची ‘मिजास’; पाहा खास फोटो
मालिकेचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना : 8-12 डिसेंबर, गाबा
दुसरा कसोटी सामना : 16-20 डिसेंबर, एडिलेड
तिसरा कसोटी सामना: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
चौथा कसोटी सामना : 5-9 जानेवारी, सिडनी
पांचवा कसोटी सामना : 14-18 जानेवारी, पर्थ