Ajinkya Rahane ला हटवणार; हा खेळाडू होणार नवा उप कर्णधार !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ डिसेंबर । भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतेय. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर आली आहे. टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं. रहाणेच्या खराब फॉर्ममुळे त्याची कारकीर्द संकटात आहे.

अशात परिस्थितीत बीसीसीआय आता त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवण्याचा विचार करतंय. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघाचा उपकर्णधार कोण असणार आहे हे याबाबत माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “निवडीची बैठक काही दिवसांत आयोजित केली जाईल. त्यानुसार रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार करण्यात येणार हे निश्चित आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. मात्र, हा दौरा निश्चित वेळापत्रकानुसार आयोजित केला जाणार नाही. बीसीसीआयने क्रिकेट दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात बॉक्सिंग-डे कसोटीने होणार असल्याची माहिती दिली.”

भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे अत्यंत खराब फॉर्ममधून आहे. रहाणे न्यूझीलंडविरुद्ध वाईटरित्या फ्लॉप झाला आहे. किवी संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. रहाणेची फलंदाजीची सरासरीही काही काळापासून 12 च्या आसपास आहे. रहाणेच्या जागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे आता रहाणेची कारकीर्द संपुष्टात येताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *