परदेशी पर्यटकांसाठी भारताचे दार १५ एप्रिल पर्यंत बंद

Spread the love
महाराष्ट्र २४ – मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे जनता त्रस्त होत आहे. लोकांची भीति वाढत चालली आहे. भारतात देखील कोरोना पीडित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने कडक पाऊल उचललं आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकाने व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे.
क्रेंद सरकारने परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे. 13 मार्च मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होत असून पुढील महिन्यात 15 एप्रिल पर्यंत भारताचा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामध्ये डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, यूएन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *