लस घ्या अन् कोरोना नियम पाळा; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन ; पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनबाधित,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉन या विषाणूने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. डोंबिवलीनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे या विषाणूने शिरकाव केला आहे. आज पुण्यात एक आणि पिंपरी चिंचवड येथे सहा असे एकूण सात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉनग्रस्तांचा आकडा आता आठवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचित केली आहे. त्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करा तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्या असे आवाहन केले आहे.

पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले पिंपरी चिंचवड येथे आढळलले एकूण सात रुग्ण कोणते आहेत. ते कोठून आलेले आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिलीय. “एक नायजेरीयन सिटीझन असलेली 45 वर्षीय महिला पिंपरी चिंचवड येथे आली होती. त्या त्यांच्या भावाकडे आल्या होत्या. त्यांच्यासोबत दोन मुलीदेखील आल्या होत्या. या महिलेचा भाऊ, महिलेच्या भावाची दोन मुलं. महिलेच्या दोन मुली आणि ही महिला अशा एकूण सहा जणांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून ट्रेस केलं होतं. त्यांना पहिल्या दिवसापासून क्वॉरन्टाईन केलं होतं. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीतेय. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तेरा जणांना ट्रेस करण्यात आलं आहे. त्यांचे स्पॅम्पल पाठवले होते,” अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिलीय.

नागरिकांनी लस घ्यावी, कोरोना नियम पाळावे
तसेच पुढे बोलताना त्यांनी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळवे, घाबरून जाऊ नये. लसीकरण करुन प्रतिबंधक उपायांची अमंलबजावणी नागरिकांनी करावी, असे आवाहन जनतेला केले.

दरम्यान, सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *