स्वस्तात मस्त Infinix Note 11 या महिन्यात लाँच होणार, Moto G31 ला टक्कर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ डिसेंबर । Infinix ही हाँगकाँगची स्मार्टफोन निर्माती कंपनी भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी भारतीय बाजारात Infinix Note 11 सादर करू शकते. हा स्मार्टफोन डिसेंबरमध्येच लॉन्च केला जाऊ शकतो. Note 11 मध्ये 6.7 इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे, MediaTek Helio G88 चिपसेटसह यात 4GB पर्यंत RAM आहे. Infinix Note 11 नवीन लाँच झालेल्या Moto G31 ला टक्कर देईल, जो बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. (Infinix Note 11 to launched in india in December 2021)

रिपोर्ट्सनुसार, Infinix Note 11 डिसेंबरमध्ये खास फ्लिपकार्टवर लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये असण्याची शक्यता आहे. Moto G31 देखील 12,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. Note 11 आधीच निवडक मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Infinix Note 11 मध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा FHD+ विविड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह MediaTek G88 प्रोसेसर वर आधारित असेल. तसेच Infinix Note 11 आउट ऑफ द बॉक्स Android 11 वर चालतो.

Infinix Note 11 चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 11 मध्ये त्याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये क्वाड LEDs सह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G31 ला टक्कर
Infinix Note 11 हा स्मार्टफोन बाजारात Moto G31 ला टक्कर देईल. Moto G31 मध्ये 6.4 इंचाचा FHD+ OLED पॅनल आहे. हा फोन Mediatek Helio G85 4G प्रोसेसरसह सुसज्ज आहे. जो 4GB आणि 6GB RAM तसेच 64GB/128GB इंटर्नल स्टोरेज पर्यायासह येतो. हा स्मार्टफोन मोठ्या 5,000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, ही 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, असा कंपनीचा दावा आहे.

Moto G31 मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 118 डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यू (FoV) यांचा समावेश आहे. तसेच यात f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्सदेखील मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *