ऑनलाइन ग्राहकांवर 5-स्टार रेटिंग देण्यासाठी विक्रेते टाकतात दबाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ डिसेंबर । ब्रिटिश नियामक अशाच प्रकरणांत अॅमेझॉन आणि गुगलची चौकशी करताहेत कुठलेही प्रॉडक्ट ऑनलाइन खरेदी करताना ग्राहक सर्वाधिक विश्वास त्या प्रॉडक्टचे रेटिंग आणि रिव्ह्यूवर ठेवतात. पण दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्म्सवर रेटिंग आणि रिव्ह्यूबाबत हेराफेरी केली जात आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या देशातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांवर विक्रेते खरेदीदारांवर प्रॉडक्टला 5 स्टार रेटिंग देण्यासाठी दबाव टाकत आहेत.

अॅमेझॉनकडून वेट मशीन खरेदी करणारे व्हेरिफाइड कस्टमर विश्वास शहा म्हणाले की, प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर विक्रेत्याकडून कॉल आला की तुम्ही आम्हाला अॅमेझॉनवर 5 स्टार रेटिंग द्या, त्यानंतर तुम्हाला वॉरंटी ईमेल करू. अशाच प्रकारे फ्लिपकार्टवरून शॉपिंग करणाऱ्या सुरतच्या एका व्यक्तीने सांगितले की, प्रॉडक्ट खरेदी केल्यानंतर 5 स्टार रेटिंग दिल्यास ६ महिन्यांच्या अतिरिक्त वॉरंटीची लालूच मला दाखवण्यात आली. सामान्य प्रॉडक्ट असूनही त्याचे रेटिंग खूप हाय होते, त्याचा अर्थ असा की विक्रेत्याने अशाच प्रकारे हाय रेटिंग मिळवले आहे. ‘कन्झ्युमर व्हॉइस’ या ग्राहक हक्क संघटनेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असीम सान्याल म्हणाले की, विकसित देशांत फेक रिव्ह्यू रेटिंगच्या विरोधात कायदा आहे, पण भारतात नाही. त्याचा फायदा ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे वस्तू विक्री करणारे विक्रेते घेतात.

अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आमची टीम खोट्या रिव्ह्यू-रेटिंगचा शोध घेण्याचे आणि ते रोखण्याचे काम करते. २०२० मध्ये आम्ही २० कोटींपेक्षा जास्त संशयित खोटे रिव्ह्यू हटवले. त्यापैकी ९९% खोटे रिव्ह्यू आम्ही स्वत: शोधले होते. फ्लिपकार्टने या प्रकरणी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

‘कॉम्पिटिशन अँड मार्केट अॅथॉरिटी’(सीएमए) या ब्रिटिश नियामकाने या वर्षी जूनमध्ये अॅमेझॉन आणि गुगलविरुद्ध चौकशी सुरू केली. अॅमेझॉन व गुगलने खोट्या रिव्ह्यूची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप आहे. ते ब्रिटनमध्ये कायद्याचे उल्लंघन आहे. सीएमएचे सीईओ अँड्रिया कोसेली यांनी चौकशी सुरू करताना म्हटले होते की, खोटा रिव्ह्यू वाचून ऑनलाइन शॉपिंग करणारे लोक भ्रमित असतात. काही व्यावसायिक 5 स्टार रिव्ह्यूद्वारे प्रॉडक्ट्स आणि सेवा चांगल्या दाखवून जास्त विक्री करण्यात यशस्वी ठरत असतील तर कायद्याद्वारे त्यांना रोखले जावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *