महाराष्ट्र २४ मुंबई : जगभरात हाहाकार उडवून दिलेला कोरोना महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या धास्तीने जगभरातील शेअर बाजारात त्याचे पडसाद दिसून येत आहेत. देशातील शेअर बाजारातही आज शुक्रवारी हाहाकार उडाला. शेअर बाजार कोसळला असताना सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली. काल प्रतितोळा ४४ हजार २०० असा सोन्याचा दर होता, तर आज प्रतितोळा ४१ हजार ६०० असा दर आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर प्रतितोळा २६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
►शेअर बाजारात कोरोनाचा अभूतपूर्व हाहाकार; तब्बल ३१०० अंकांनी कोसळला
देशातील शेअर बाजारातही आज, शुक्रवारी निर्देशांक तब्बल ३१०० अंकांनी तर तर निफ्टी तब्बल ९५० अंकांनी कोसळला. सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे.दरम्यान निफ्टीमधे लोअर सर्किट लावण्यात आले आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये ४५ मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. निर्देशांकावर अद्याप सर्किट लावलेले नाही. मात्र निर्देशांक साडे नऊपेक्षा जास्त टक्क्यांनी गडगडल्यास कधीही सर्किट लावले जाऊ शकते.