अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : हेडमुळे ऑस्ट्रेलिया विजयाकडे वाटचाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबूशेन यांच्या अर्धशतकांनंतर ट्रॅव्हिस हेडचे दिमाखदार नाबाद शतक या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेत दुसऱ्या दिवशी ७ बाद ३४३ धावा उभारत १९६ धावांची आघाडी घेतली.

वॉर्नरने ४८ आणि ६० धावांवर असताना मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत मार्नस लबूशेनच्या (७४ धावा, ६ चौकार, २ षटकार) साथीने दुसऱ्या गड्यासाठी १५६ धावांची बहुमोल भागीदारी रचली. परंतु ९४ धावांवर (११ चौकार, २ षटकार) असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर रॉबिन्सनने वॉर्नरचा झेल घेतला. मग २ बाद १८९ धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाची ५ बाद १९५ अशी घसरण झाली. पण हेड आणि पॅट कमिन्स यांनी ७० धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हेड १२ चौकार आणि २ षटकारांसह ९५ चेंडूंत ११२ धावांवर खेळत होता. इंग्लंडकडून रॉबिन्सनने टिच्चून गोलंदाजी करताना ४८ धावांत ३ बळी मिळवले.

तिसऱ्या दिवशी २ ऱ्या सत्रात हेड बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने ४२५ धाव केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी २ ऱ्या सत्रा पर्यंत इंग्लंड ची अवस्था २ बाद १०३ होती अजून ही इंग्लंड १७५ धावांनी पिछाडीवर आहे. मलान ३३ आणि रूट २५ पीच वर टिकून आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *