महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । पुणे । संगीत क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या कलवंताचा उचित सन्मान व्हावा, या हेतूने ग्रोथ प्रोडक्शन प्रस्तुत सन्मान मराठी संगीताचा या अवॉर्ड शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा अवॉर्ड सोहळा मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रथमच होत आहे. आतापर्यत सिरिअल्स सिनेमा या क्षेत्रांना सन्मानित केले गेले आहे. मात्र आतापर्यंत संगीताशी संबंधित अवॉर्ड शो महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेला नाही. संगीत क्षेत्रातील कलावंतांनी योग्य न्याय व त्यांचा उचित सन्मान देण्याचा आयोजकांचा मानस आहे.
हा एक साधारण अवॉर्ड शो नसून, सन्मान मराठी संगीतचा हा एक असा अवॉर्ड शो आहे जो महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच सांस्कृतिक कलात्मकतेचे दर्शन घडविणारा आहे. संगीत आणि अल्बम या सर्व क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी आतापर्यंत मेहनत आणि कष्ट करून आपली ओळख बनवली आहे. या सर्व महान कलाकारांना सन्मानित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लोकांना कलाकारांच्या कलेची ओळख करून देणारा आहे. या शोचे नामांकन सूरू झालेले आहे. नामांकनासाठी ९१३०४६९८६९ या नंबर वर मॅसेज करण्याचे आवाहन आयोजनकांनी केले आहे.
या अवॉर्ड शोमध्ये दिले जाणारे पुरस्कार
१. बेस्ट कोरियो ग्राफर
२. बेस्ट सिंगर
३. बेस्ट डेबू
४. बेस्ट सिनेमॅटोग्राफी
४. बेस्ट ट्रेंडिंग गाणे
५. बेस्ट ऍक्टर
६. बेस्ट एक्टरेस
७. बेस्ट सपोर्टींग रोल असे नॉमिनेशन करण्यात आले आहे.