व्हॉट्सअ‌ॅप स्कॅम अलर्ट ! ‘या’ फीचरचा जपून वापर करा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते !

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । व्हॉट्सअॅप मेसेंजर हे जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. मात्र, वापरकर्त्यांची वाढती संख्या आणि नवीन काही गोष्टींमुळे ते धोकादायक देखील होत आहे. कंपनी बर्‍याचदा आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवते आणि सतत गोपनीयता पद्धती जारी करते. तरीही हॅकर्स लोकांच्या व्हॉट्सअॅपवर लक्ष ठेवतात.

सायबर गुन्हेगारांनी अॅपमध्ये उपलब्ध ‘व्हॉट्सअॅप पे’द्वारे लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. जेथे वापरकर्ता व्हॉट्सअॅप वापरून दुसऱ्या वापरकर्त्याला थेट पैसे ट्रान्सफर करू शकतो.

युनायटेड किंगडममधील हॅकर्सने लोकांना फसवण्याचा मार्ग शोधला आहे. आपल्या टार्गेटला फक्त ‘हॅलो मम’ किंवा ‘हॅलो सर’ मेसेज पाठवला आणि त्यानंतर लगेचच खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भात मेसेज पाठवला.

या हॅकर्सने आधीच 50,000 GBP (अंदाजे 50 लाख रुपये) लुबाडले आहेत. हे केवळ UK पुरतेच मर्यादित नाही. भारतातही अशा काही केस समोर आल्या आहेत.

या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांची कॉन्टेक्ट लिस्ट आणि कोणती व्यक्ती आपल्याला मेसेज करते आहे, हे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *