सर्व सामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या किमती उतरल्या , 1 लीटर तेलाचा आहे हा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । नवी दिल्ली । सामान्यांचा विविध जीवनावश्यक वस्तूंसाठी महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर, भाजीपाला यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती देखील सामान्यांच्या खिशाला न परवडणाऱ्या स्तरावर आहेत. मात्र सध्या यातून सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. आयात शुल्कात (Import Duties) कपात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती गेल्या महिनाभरात 8 ते 10 रुपयांनी कमी झाल्या आहेत. इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) च्या म्हणण्यानुसार, तेलबियांचे वाढलेले देशांतर्गत उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील मंदीचा कल यामुळे आगामी महिन्यांत खाद्यतेलाच्या किमती 3-4 रुपये प्रति किलोने आणखी कमी होऊ शकतात.

गेल्या काही दिवसांपासून पाम, सोया आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किमती वाढल्याची माहिती एसईच्या अध्यक्षांनी दिली आहे. SEA चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी असे म्हणाले की, ‘गेले काही महिने पाम, सोया आणि सूर्यफूल सारख्या सर्व तेलांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे भारतीय खाद्यतेल ग्राहकांसाठी ते खूप त्रासदायक ठरत होते. SEA ने आपल्या सदस्यांना दिवाळीपूर्वी शक्य तितक्या किमती कमी करण्याचा सल्ला दिला होता. आम्हाला याची पुष्टी करताना आनंद होत आहे की, केंद्राने खाद्यतेलांवरील आयात शुल्कही कमी केले आहे. अनेक उपायांमुळे गेल्या 30 दिवसांत खाद्यतेलाच्या किमती सुमारे 8-10 रुपये प्रति किलोने खाली आल्या आहेत.’

SEA ने सांगितले की, त्यांच्या सदस्यांनी कमी किमतीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याआधीही पाललं उचलली आहेत. चतुर्वेदी म्हणाले की, त्यांच्या सदस्यांनी तेलाच्या कमी किमतीचे फायदे ग्राहकांना देण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या मते, येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या सदस्यांकडून किमती आणखी 3-4 रुपये प्रति किलोने कमी होतील. यामुळे खाद्यतेल ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *