आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई :  सध्याही आमदारांना गाडी खरेदीसाठी 10 लाखांचं कर्ज दिलं जातं. मात्र, ती रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार महाराष्ट्रातील आमदारांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.   

गाडी खरेदीसाठी सरकारनं दिलेली मूळ रक्कम आमदाराला फेडावी लागेल. त्यावरील व्याज सरकारी तिजोरीतून भरलं जाईल. अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत ही घोषणा केल्यानंतर सर्व आमदारांनी मोठमोठ्यानं बाक वाजवून आनंद व्यक्त केला.
नुकत्याच मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात आमदारांच्या निधीत वाढ करण्याचाही निर्णय घेतला गेला आहे. आमदार निधीत एक कोटींची वाढ करून तीन कोटी रुपये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *