वुहानच्या रुग्णालयातून डिस्चार्ज झाला शेवटचा करोना पेशंट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- वुहान; चीनच्या ज्या वुहान शहरातून करोना या जीवघेण्या विषाणूचा फैलाव झाला त्या शहरात आता रुग्णालयात एकही करोना रुग्ण नसल्याची बातमी आहे. करोनामुळे जगभरात ५ हजाराहून अधिक बळी गेले आहेत मात्र वुहान मध्ये आता करोना रुग्णांची संख्या एक आकडी झाली आहे. वुहान मध्ये करोनाची लागण झाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालये मोठ्या संख्येने सुरु केली गेली होती ती सर्व आता बंद केली गेल्याचे व्हीडीओ जारी केले गेले आहेत.

यात पहिल्या व्हिडीओ मध्ये हुबेईच्या वुहान मधील हॉस्पिटल मधील करोनाचे सर्व रुग्ण डिस्चार्ज झाल्यावर त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर शियांल लाईन्ग एका रिकाम्या बेडवर पडलेले दिसत आहेत तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये तात्पुरत्या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस मास्क उतरविताना दिसत आहेत. रॉयटर्सच्या बातमीनुसार वुहान मध्ये शेवटची जी दोन तात्पुरती रुग्णालये सुरु होती तीही आता बंद केली गेली आहेत. या शहरात ५६२ लोकांना करोनाची लागण झाली होती त्यातील ३९२ बरे झाले आहेत.

या काळात येथील डॉक्टर्सना रात्रंदिवस काम करावे लागले आणि त्यातील काही डॉक्टर नर्सेसना उपचार करत असताना करोनाचा संसर्ग झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *