![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय तरुणी हरनाज कौर संधूनं 70 वा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतानं 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे विजेतेपद पटकावलं आहे.
सोमवारी सकाळी इस्रायलमधील इलात येथे आयोजित 70व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताची हरनाज कौर प्रथम क्रमांक मिळवून मिस युनिव्हर्स 2021 बनली आहे. हरनाजच्या आधी 1994 मध्ये सुष्मिता सेननं आणि 2000 मध्ये लारा दत्ता यांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. भारताने आता तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे.
तिला गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स मेक्सिकोचा मुकुट अँड्रिया मेझानं मुकुट घातला. पॅराग्वेची 22 वर्षीय नादिया फरेरा दुसरं, तर दक्षिण आफ्रिकेची 24 वर्षीय लालेला मसवाने तिसरं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, संधूला विचारण्यात आले की, तरुणींना त्या आजच्या दडपणाचा सामना कसा करायचा याविषयी ती काय सल्ला देईल.
उत्तर देताना संधू म्हणाली, आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव आहे तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोला. स्वतःसाठी बोला कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात, तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.