महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१4 डिसेंबर । किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर नोव्हेंबरमध्ये किंचित वाढून ४.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुख्यत्वे, अवकाळी पावसामुळे अन्नधान्य, फळ व भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याचा हा परिणाम असल्याचे सरकारकडून सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने दर्शविले.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर आधीच्या ऑक्टोबर २०२१ मध्ये ४.४८ टक्के पातळीवर होता, तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याने ६.९३ टक्क्यांची चिंताजनक पातळी गाठली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई ही आधीच्या महिन्यांतील ०.८५ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या नोव्हेंबरमध्ये १.८७ टक्के होती.