म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । MHADA Online Exam : म्हाडाची भरती परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाची परीक्षा होण्याची शक्यता आहे.

परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षेच्या काही तास आधी पेपर पुढे ढकलल्याची घोषणा करण्यात आली. पण, आता असा गैरप्रकार घडू नये यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. म्हाडातील 14 पदांच्या 565 रिक्त जागांसाठी ही परीक्षा होणार आहे.

आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील (Mhada Exam) गैरप्रकार उघडकीस आला. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हा गैरप्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

‘म्हाडा’ पेपर मिळवण्यासाठी (Paper Leak) कोडवर्डचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. आरोपींना काही कोडवर्ड तयार केले होते. एकमेकांशी संभाषण साधताना आरोपी या कोडवर्डचा वापर करत होते. आरोपींच्या तपासात ही माहिती समोर आली आहे. यातला प्रमुख कोडवर्ड होता, ‘घरातली वस्तू कधी मिळणार’. म्हाडाच्या पेपरचं काय, असे विचारल्यास संशय येईल, म्हणून आरोपींनी हा कोडवर्ड वापरल्याचे तपासात पुढे आले आहे. प्रश्‍नपत्रिका मिळण्यासाठी अनेक उमेदवार आरोपींशी सातत्याने फोनवरून संपर्कात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *