महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ डिसेंबर । कन्या म्हणजे दान करता येईल अशी वस्तु नाही, असं म्हणत एका महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या लग्नात कन्यादान विधीला फाटा दिला आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे झालेल्या या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.
येथील जोबा गावात आयएएस अधिकारी असलेल्या तपस्या परिहार आणि आयएफएस अधिकारी गर्वित गंगवार यांचा विवाह संपन्न झाला. तपस्या यांनी यूपीएससी परीक्षेत 23वा क्रमांक मिळवला आहे. त्यांचा गर्वित यांच्याशी झालेला विवाह चांगलाच चर्चेत आहे.