रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, घरातून निघण्याआधी यावर नजर टाका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ डिसेंबर । Mumbai Mega Block News : रविवारी सकाळपासून मध्य रेल्वेवर 18 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. (18-hour jumbo block on Central Railway) पाचव्या, सहाव्या मार्गांसाठी दिवा-ठाणे स्लो मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

ठाणे ते दिवा दरम्यान, मध्य रेल्वेकडून रुळांची जोडणी करण्यासह काही तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोकल सेवाही बंद राहणार आहे. तसेच मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे.

रेल्वेच्या कामासाठी उद्या रविवारी 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकल, मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. वेळोवेळी ठाणे ते दिवा दरम्यानच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता या मार्गिकेच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. पविवार, 19 डिसेंबरला 18 तासांच्या मोठ्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये रुळांची जोडणी करण्यासह काही तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. हा ब्लॉक सकाळी 8 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *