‘या’ राशींना मिळेल शुभ परिणाम ; ३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार शनि

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आणि ९ ग्रहांचा अभ्यास केला जातो. सर्व ९ ग्रहांमध्ये शनि हा ग्रह सर्वात महत्वाचा मानला जातो. कारण शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात असही म्हटल जात. या ९ ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने चालतो, त्यामुळे त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. जेव्हा शनि राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो.

३० वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश
शनि ग्रह सध्या स्वतःच्या राशीत मकर राशीत बसला आहे. पुढील वर्षी २९ एप्रिल रोजी शनि ३० वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. शनि हा देखील या राशीचा अधिपती ग्रह आहे. यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असते.

 

कुंभात शनीच्या प्रवेशाने कुंभ, मीन आणि मकर राशीला साडेसातीचा दुसरा, पहिला आणि तिसरा चरण सुरू होईल. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर अडचणी सुरू होईल. शनीच्या या संक्रमणामुळे तूळ आणि मिथुन राशीच्या लोकांची अडचणीपासून सुटका होईल.

 

या राशींसाठी शनीचे संक्रमण होईल शुभ
मेष, तूळ, वृषभ आणि धनु राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणामुळे शुभ परिणाम मिळतील. या दरम्यान या राशीच्या धनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि उत्पन्न वाढेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचाही पूर्ण पाठिंबा मिळेल.

 

साडेसाती म्हणजे काय ?
ज्योतिषांच्या मते माणसाच्या आयुष्यात तीन वेळा साडेसाती नक्कीच येते. पहिल्या चरणात व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि दुसऱ्या चरणात पोटावर शनि वास करतो. तसेच तिसऱ्या चरणात शनि चरणी येतो. हा क्रम साडेसातपर्यंत सुरू राहतो. म्हणजे माणसाला साडेसात वर्षे शनीच्या दशेत राहावे लागते. साडेसातीचे तीन टप्पे असून प्रत्येक टप्प्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *