एक बिअरची बाटली पडली चक्क 49 लाखांना

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । हॉटेलमध्ये अथवा बारमध्ये बिअर पिणे नेहमीच महाग पडते असते. मात्र विचार करा जर तुम्हाला एका बिअरसाठी तब्बल सहा आकडी रक्कम भरावी लागली तर ? ऑस्ट्रेलियन क्रिकेट लेखक पिटर लालोर यांना एका बिअर बॉटलसाठी तब्बल 99,983.64 ऑस्ट्रेलियन डॉलर ( जवळपास 49 लाख रूपये ) द्यावे लागले आहेत. विशेष म्हणजे पैसे दिल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. मॅनचेस्टरच्या मेलमैसन हॉटेलमध्ये ही घटना घडली.

पीटर सध्या अशेस मालिका कव्हर करण्यासाठी ब्रिटनमध्ये आहेत. याबाबत त्यांनी ट्विटरवर बिअरच्या बॉटलचा फोटो शेअर करत लिहिले की, इतिहासातील सर्वात महागडी बिअर. मी यासाठी तब्बल 99,983.64 डॉलर दिले आहेत.

या बिअरच्या बॉटलची खरी किंमत 485 रूपये आहे.

पीटरने पैसे दिले त्यावेळी चश्मा घातला नव्हता. याचवेळी पेमेंट मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि बिल तब्बल 49 लाखांचे झाले. बारमध्ये बसलेली मुलगी देखील बिलाची स्लिप बघून आश्चर्यचकित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *