महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर ।
1. पुणे जिल्ह्यातील जुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. ४४ वर्षाच्या नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा नागरिक दुबईवरून आला असून,तो मुंबई येथील विमानतळावर उतरल्यानंतर सर्दीचा ञास असल्याने तो सरळ दवाखान्यात दाखल झाला.
2. म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोव-यात… डॉ. प्रीतिश देशमुखच्या घरात पोलीस भरतीची ओळखपत्रं सापडली आहेत… तर क्लास चालकांनी रेटकार्डच तयार केल्याचं उघड झालंय.
3.जगातल्या 89 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट पोहोचला आहे. तीन दिवसांत रूग्णसंख्येत दुपटीने वाढ झालीय असा इशारा WHO ने दिलाय. कम्युनिटी ट्रान्समिशनची दाट शक्यता असलेल्या ठिकाणी अशा ठिकाणी ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टाच्या तुलनेत वेगानं पसरण्याची अधिक शक्यता आहे असं WHO ने म्हटलंय.
4. देशभरात ओमाक्रॉनचे 153 रुग्ण आहेत. रविवारी देशात 10 ओमायक्रॉन बाधित आढळलेयत. त्यातले राज्यात 6 जण तर गुजरातमध्ये 4 जण आहेत. 11 राज्यात ओमायक्रॉन पसरलाय.
5. महाराष्ट्रात थंडीची लाट…धुळ्यात तापमानाचा पारा 5.5 अंश सेल्सिअस वर… जळगाव,रायगड,पालघर,मुंबईच्या तापमानात घट…उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्य गारठला आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.