अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची ईडी कार्यालयात चौकशी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीने समन्स बजावले आहेत. जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीक प्रकरणामध्ये ऐश्वर्या रायचे नाव आले होते. आज सकाळी ऐश्वर्या बच्चन ईडीच्या कार्यालयात पोहोचली आहे. मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीच्या हालचाली सुरू असून. दिल्लीहून ईडीची पथकं मुंबईत दाखल झाली आहेत. काही ठिकाणी छापेमारी झाल्याचं वृत्त आहे.

पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव समोर आलं होतं. त्याच्या चौकशीसाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावणयात आले होते. जवळपास तीन तास चाललेल्या या चौकशीतून नेमके काय पुढे आले हे अजून समजू शकले ऩाही. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

पनामा पेपर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे सुद्धा नाव आले होते, ज्याची आयकर विभागाकडून चौकशी देखील केली जात आहे. 2017 मध्ये, आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करणार्‍या ईडीला अमिताभ बच्चन यांनी चौकशीच्या संदर्भात त्यांना जारी केलेल्या नोटिसांचे उत्तर दिले होते. मनी लाँडरिंग विरोधी एजन्सीच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते की त्यांनी बच्चन कुटुंबाला नोटीस बजावल्या आहेत. ज्यात त्यांना RBI च्या उदारीकृत रेमिटन्स स्कीम अंतर्गत 2004 पासून त्यांच्या परदेशी रेमिटन्सचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *