महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० डिसेंबर । जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गुगल प्ले स्टोअरवर एक अॅप सापडले आहे, ज्यामध्ये धोकादायक मालवेअर आहे. हे अॅप आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. एका रिपोर्टनुसार, या अॅपमध्ये जोकर मालवेअर (Joker Malware) आहे. गूगकडून सर्व युजर्सला हे अॅप त्वरित डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे अॅप डिलीट न केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
इतक्या मोठ्या संख्येने यूजर्सने डाउनलोड केलेल्या या अॅपचे नाव ‘कलर मेसेज’ (Color Message) असे आहे. हे अॅप इमोजीद्वारे एसएमएस मेसेज पाठवणे अधिक मजेदार बनवण्याचा दावा करते. गूगल प्ले स्टोअरवर पहिल्या नजरेत पाहता हे अॅप सुरक्षित वाटत असले तरी तसे नाही आहे. मोबाइल सिक्युरिटी सोल्युशन्स फर्म Pradeo च्या टीमने या अॅपमध्ये जोकर मालवेअर असल्याचे शोधून काढले आहे.