5 की 6 वर्ष, इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी किती वय हवं? , शिक्षण संचालनालयाचे स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ डिसेंबर । विद्यार्थ्यांना प्ले ग्रुप ,नर्सरी, पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना विद्यार्थ्याचे नेमकं वय काय असावं याबाबत मागील वर्षी शासन निर्णय जारी करण्यात आला होता आणि त्यामध्ये ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत विद्यार्थ्याचे सहा वर्षे वय पूर्ण असल्यास त्याला पहिली मध्ये प्रवेश मिळू शकेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने ३० सप्टेंबर ऐवजी आता ३१ डिसेंबर अशी शिथिलता आणण्यात आली. मात्र ऑक्टोबर , नोव्हेंबर, डिसेंबरमधील जन्म झालेल्या बालकांच्या प्रवेशाबाबतीत अडचणी निर्माण होऊ लागल्या. अनेक ठिकाणी प्रवेश घेताना पालकांना अडचणी येऊ लागल्या आहेत हे पाहता शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या वयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे

दरम्यान २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षांसाठी १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान जन्मलेल्या आणि वयाची ६ वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी पहिली प्रवेशासाठी पात्र असल्याचे स्पष्टीकरण संचलनालयाकडून देण्यात आले आहे.राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांना २०२२-२३ मधील नर्सरी, पहिली प्रवेशांसाठी हा लागू राहणार आहे.

5 की 6 वर्ष, इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी किती वय हवं? , शिक्षण संचालनालयाचे स्पष्टीकरण

राज्यात राज्य मंडळाव्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएई, आयबी, अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिलीला प्रवेश देताना विविध तारखा ग्राह्य धरून प्रवेश दिले जातात. तसेच पूर्व प्राथमिक मधील प्रवेशासाठी वयाची अट निश्चित नव्हती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकवाक्यता आणण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.त्यामध्ये आता महिन्यांचे स्पष्टीकरण देऊन आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वय
प्ले ग्रुप/ नर्सरी १ ऑक्टोबर २०१८- ३१ डिसेंबर २०१९ किमान वय ३
ज्युनिअर केजी १ ऑक्टोबर २०१७- ३१ डिसेंबर २०१८ किमान वय ४
सिनिअर केजी  १ ऑक्टोबर २०१६- ३१ डिसेंबर २०१७ किमान वय – ५
पहिली १ ऑक्टोबर २०१५- ३१ डिसेंबर २०१६ किमान वय –  ६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *