![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । तुम्ही वीजेचं कनेक्शन वापरत असाल मग घरात असो की शेतात की दुकानात. तुम्हाला असं नक्कीच वाटत असेल आपल्याला वीज 24 तास मिळावी पण त्याचं बिल मात्र कमी यावं. निवडणुकीत (Elections) राजकीय पक्ष अशी आश्वासनं देतात की वीजबिल माफ करू पण कोणी करत नाही. मग वीज बचत करून आपले पैसे वाचवायचे असतील तर काही टिप्स तुम्हाला माहित असायला हव्यात.
प्रत्येक घरात बल्ब,पंखा,कूलर, AC, माइक्रोवेव्ह,फ्रीज,हीटर व गिझर अशी इलेक्ट्रिकवर चालणारी उपकरणं (Electric Equipments)असतातच. त्यांनी वीजही बरीच लागते पण आम्ही तुम्हाला पटकन करता येतील अशा काही टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुमची वीज कमी वापरली जाईल आणि पैसेही वाचतील, असं वृत्त झी न्यूजने दिले आहे.
किचनमध्ये असलेल्या फ्रीजचं टेंप्रेचर काही डिग्रींनी वाढवलं तरीही त्याला लागणारी वीज कमी होते. ताजं अन्न ठेवायचं असेल तर 36 ते 38 अंश फॅरेनहाईट तापमान पुरेसं असतं. नेहमी फ्रीज (Fridge)आवश्यकतेपेक्षा 5 ते 6 अंश कमी तापमानावर ठेवतात. त्याचबरोबर फ्रीजचं तापमान सेट करण्यासाठी 0 ते 5 अंश फॅरेनहाइट हे मानक ठरवलं आहे.
तसंच फ्रीजमधील फ्रीजर कायम फुल तापमानात ठेवायचा म्हणजे आत ठेवलेले पदार्थ थंड करण्यासाठी कमी उर्जा वापरली जाते. म्हणजे कमी उर्जा वापरून तुम्ही अधिक काळासाठी फ्रीज थंड ठेवू शकता. त्याचबरोबर फ्रीज खरेदी करताना त्याची एनर्जी सेव्हिंग कपॅसिटी (Energy Saving Capacity) नक्की तपासा. या टिप्समुळे तुम्ही वीजेचा वापर कमी करू शकता.
वॉशिंग मशीन आतून स्वच्छ ठेवा म्हणजे ड्रायर वेगाने चालेल आणि कपडे लवकर धुतले जातील. रात्रीच्या वेळेस कपडे धुवा त्यामुळे वीज वाचेल. थंड पाण्यानेच कपडे धुवा त्यामुळे वॉशिंग मशीनमधील वॉशरचं टेंप्रेचर सेट करावं लागणार नाही आणि वीज वाचेल. जे कपडे वाळवण्यासाठी ड्रायरची गरज आहेत्यासाठीच ड्रायर वापरा म्हणजे वीज वाचेल.
घरातLEDबल्ब वापरले तर सामान्य बल्बच्या तुलनेत 80 टक्के वीजेची बचत होते. तसंच इलेक्ट्रिक बोर्डात स्मार्ट पॉवर स्ट्रीप(Smart Power Strip)वापरली तर घरातून बाहेर करताना सगळी बटणं तुम्हाला बंद करावी लागत नाही तुम्ही घरातून बाहेर पडलात की दिवे आपोआप बंद होतात आणि वीज वाचते. उन्हाळ्यात घराला विंडो शेड लावा जेणेकरून घर थंड राहील आणि एसी आणि कूलरचा कमी वापर होईल जेणेकरून वीज वाचेल.
हिटरचं तापमान सेट केल्यानेही वीज वाचू शकते तसंच घरातील बेड किंवा सोफा हा थेट AC च्या खाली ठेवू नका म्हणजे गार वारं खोलीत पसरेल. त्यामुळे एसीवरचा ताण कमी होऊन वीज वाचेल. घराच्या छतावर सोलर पॅनल बसवूनही वीज वाचवली जाऊ शकते. घराबाहेरचे दिवे सौर उर्जेवर चालवले तरीही वीज वाचेल. अशा टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचं वीजबिल नक्कीच कमी येईल. करून तर पहा.