महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करायची संधी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. सर्किल बेस्ड ऑफिसर (SBO) या रिक्त पदासाठी भारतीय स्टेट बँकने अर्ज मागवले आहेत. १२२६ एवढी या रिक्त पदांची संख्या आहे आणि अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटही तारीख २९ डिसेंबर २०२१. प्रवेश पात्र १२ जानेवारी २०२२ ला जारी केले जाईल आणि परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी व्हायचे असेल, तर लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण शेवटची तारीख जवळ आली आहे आणि नंतर जास्त ट्रॅफिक लोडमुळे अर्ज करताना अडचणी येऊ शकतात.
या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या यादीत येणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक बँक किंवा कोणत्याही प्रादेशिक बँकेत किमान २ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे आहे. तसेच ३ फेऱ्यांमध्ये भारतीय स्टेट बँकद्वारे निघालेली ही भरती होईल. पहिल्या फेरीत लेखी परीक्षा दुसऱ्या फेरीत स्क्रीनिंग आणि तिसऱ्या फेरीत मुलाखत होईल. या सगळ्या फेऱ्यांमध्ये पास झाल्यावर उमेदवाराची निवड होईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वात आधी तुम्हाला स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या SBI CBO भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा. त्यानंतर विनंती केलेली माहिती भरा आणि नोंदणी करा. आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करून अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा आणि अर्ज फी भरा. तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या. अधिक माहितीसाठी येथे नोटीफीकेशन वाचा.