काही महत्त्वाच्या बातम्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर ।

# राज्यात ओमायक्रॉनची संख्या दिवसागणिक वाढत आहे. लसीकरणानंतरही ओमायक्रॉनचा धोका कायम असल्याचं WHOनं म्हटल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे . यंदा लेखी परीक्षेसाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे. अशा काही महत्त्वाच्या बातम्या खालील प्रमाणे….

# देशातल्या 23.59 कोटी नोकरदारांसाठी गुडन्यूज आहे. सरकारने नोकरदारांच्या EPFO खात्यात पैसे पाठवले आहेत. EPFO व्याजाच्या हप्त्याशी संबंधित पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 8.50% दराने व्याजाचे पैसे सरकारकडून क्रेडीट… EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

# एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत येणार आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. अखेरच्या तिमाहीत आयपीओ येणं शक्य नाही असं वृत्त काही संस्थांनी दिलं होतं. ते केंद्राने फेटाळून लावलंय. मात्र LIC चा IPO कधी येणार, याबाबतची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

# यंदा लेखी परीक्षेसाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे आणि अर्धा तास वाढीव वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विषयांचे पेपर सकाळी 10.30 वाजता सुरू होतील. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे मंडळानं हा वेळ वाढवून दिला.

# ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं 96 देशांत प्रवेश केल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलीये. लसीकरणानंतरही ओमायक्रॉनचा धोका कायम असल्याचं WHOनं म्हटलंय. त्यामुळे मास्कचा वापर हा ओमायक्रॉनला थोपवण्यासाठी एकमेव उत्तम उपाय असल्याचं WHOनं म्हटलंय..

# देशातील 14 राज्यात ओमायक्रॉनचा फैलाव झालाय… सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात मंगळवारीआणखी 11 रुग्णांची भर पडली. यापैकी रुग्ण मुंबई विमानतळावर तपासणीतील आहेत तर प्रत्येकी 1 रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई इथे आढळलेत. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 65 वर पोहोचलीये.

# राज्यात लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. दीड कोटी डोस राज्यात आहेत. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी हर घर दस्तक मोहिमेतून घरोघरी समुपदेशन करतायत. मुंबई, पुण्यात पहिला डोस घेणा-यांचं प्रमाण 100टक्क्यांवर पोहचतंय. पण काही जिल्ह्यात वेग वाढवण्याची गरज आहे.

# राज्यभरातून येणा-या पालख्यांना शिर्डी संस्थानची बंदी घातली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर येणा-या पालख्यांना बंदी घातली आहे. ओमायक्रॉन धोक्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लवाण्यात आले आहेत.

# मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनच्या 100 फे-या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाचवा, सहावा मार्ग फेब्रुवारीत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जलद मार्गातील थ्रू ट्रेन्सचा अडथळा दूर होणार आहे. लोकलचे नवे वेळापत्रक काम अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.

# आता जर तुम्ही घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. सिडकोच्या पाच हजार घरांची सोडत 15 जानेवारीला निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *