महाराष्ट्र २४- जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे आणि याच क्षेत्राची तुम्ही बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी निवड करणार असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातल्या मेडिकलच्या जागा वाढणार आहेत. आणि या जागा खूप जास्त आहेत. काही हजारांमध्ये ही वाढ होणार आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष आणि निती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांच्या मते जेवढ्या जागा वाढवल्या जाणार आहेत, त्यांची संख्या गेली पाच वर्षांत वाढलेल्या जागांहून अधिक आहे.
पॉल म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१४ मध्ये आश्वासन दिले होते की २०१४ पर्यंत यूजी आणि पीजी मेडिकलच्या जागा दु्प्पट होतील. त्यानुसार मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून पीजी मेडिकल अभ्यासक्रमाच्या ४,८०१ जागा वाढवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे पीजीच्या (एमडी आणि एमएस) एकूण जागा३६,१९२ होणार आहेत.’
२०१४-१५ पर्यंत देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये पीजी मेडिकलच्या एकूण २३ हजार जागा होत्या.