महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; बीजिंग :चीनमधील कोरोनाव्हायरसग्रस्त रुग्णांच्या रक्तगटाचा अभ्यास संशोधकांनी केला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये या संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे.चीनच्या वुहान आणि शेंझेन मधील 2 हजारपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या रक्तगटाचा अभ्यास या संशोधकांनी केला.तुमचा रक्तगट कोणता आहे? हे आता यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्यावरून तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे की नाही हे समजेल. तुमचा रक्तगट A असेल, तर तुम्हाला कोरोनाव्हायरसचा सर्वात जास्त धोका आहे आणि O असेल तर तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे. हे आम्ही नाही तर संशोधकांनी सांगितलं आहे.
त्यांना दिसून आलं की, A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाव्हायरसच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आणि तीव्र अशी लक्षणं दिसून आलीत, तर O रक्तगट असलेल्या व्यक्तींना इतर रक्तगटाच्या तुलनेत कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे.206 रुग्णांपैकी 85 रुग्णांचा रक्तगट A आहे, तर 52 रुग्णांचा रक्तगट O आहे.
यूएस नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फर्मेशनने ( NCBI) केलेल्या अभ्यासानुसार, भारतात O रक्तगटाची लोकं जास्त म्हणजे जवळपास 37.12 टक्के आहेत. त्यानंतर B रक्तगटाची 32.26 टक्के आणि A रक्तगटाची 22.88 टक्के तर AB रक्तगटाची अगदी कमी म्हणजे 7.74 टक्के लोकं आहेत.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार चीनमधील कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण पाहता यामध्ये एकूण मृत्यूदर 2.3 टक्के आहे. मात्र 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा दर 15 टक्क्यांपर्यंत वाढतो. तसंच अनेक अहवालात असंही दिसून आलं की, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे.
त्यामुळे एकंदरच वृद्ध व्यक्ती, पुरुष आणि आता A रक्तगट असलेल्या व्यक्तींना कोरोनाव्हारसचा सर्वात जास्त धोका आहे.
मात्र जरी तुमचा रक्तगट O असला तरी तुम्ही कोरोनाव्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित आहात असा नाही, त्यामुळे सरकार आणि डॉक्टरांनी ज्या काही सूचना दिल्यात त्या पाळा, आवश्यक ती काळजी घ्या आणि कोरोनाव्हायरसपासून स्वतचा बचाव करा.