महाराष्ट्र २४- करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा ही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्सबरोबरचा क्रिकेटचा सराव थांबवावा लागला. सराव थांबवल्यावर धोनी थेट रांचीमध्ये दाखल झाला. पण आता क्रिकेट सोडल्यावर धोनी थेट बॅडमिंटन खेळायला लागला असल्याचे दिसत आहे. धोनी बॅडमिंटन खेळत असल्याचा एक व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे. पण धोनी क्रिकेट सोडून बॅडमिंटन खेळायला का लागला आहे, असा प्रश्न काही चाहत्यांना पडलेला आहे.
सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे धोनी क्रिकेटच्या मैदानात सराव करून शकत नाही. त्यामुळे धोनीने रांचीला आल्यावर एक शक्कल लढवली आहे. बॅडमिंटन हा खेळ शरीराला लवचिक बनवतो, त्याचबरोबर तो कमी जणांमध्ये खेळला जाऊ शकतो. त्यामुळे धोनीने आता फिटनेस कायम राखण्यासाठी बॅडमिंटन खेळायचे ठरवले असल्याचे काही जण म्हणत आहेत.आयपीएल नेमकी कधी खेळवली जाईल, हे कोणालाही माहिती नाही. पण यंदाच्या आयपीएलवर धोनीचे करिअर अवलंबून आहे. त्यामुळे धोनी आयपीएलसाठी फिट राहण्यासाठी बॅडमिंटन खेळत आहे.
आयपीएल स्पर्धेत यावेळी सर्वांना उत्सुकता होती ती महेंद्र सिंह धोनीच्या पुनरागमनाची. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर धोनीने आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी चेन्नईत त्याने १ मार्चपासून सराव देखील सुरू केला. पण करोनामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. धोनी देखील चेन्नईतून रांचीला परतला. घरी परतलेल्या धोनी बाईक घेऊन बाहेर पडला. धोनीला मोटरसायकल चालवण्याची आवड आहे. धोनीला गाडीवर पाहताच चाहत्यांनी त्याच्या सोबत फोटो काढण्यास सुरूवात केली. एका सिग्नलवर धोनी थांबला असता चाहत्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. तर काहींनी सेल्फी घेतले. जसा सिग्नल सुरू झाला धोनीने चलो, चलो,चलो म्हणून गाडी सुरू केली. धोनीचा हा व्हिडिओ सध्या टिकटॉकवर वेगाने व्हायरल होत आहे.
No day off for fitness freak MS Dhoni, as he resumes badminton session in Ranchi.😇🔥 #FitnessFreak #MSDhoni #Dhoni pic.twitter.com/z1ZDVHRkCa
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) March 16, 2020