महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ डिसेंबर । नाताळ (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year Celebration) स्वागतासाठी तुम्ही लोणावळ्याला (Lonavala) जाण्याचा विचार केला असेल तर ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर जाहीर झालेली नवी नियमावली (New rules) तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. लोणावळ्यामध्ये कोविड-19 (Covid 19) प्रतिबंधक लसीचे दोन डोस (Both doses Vaccine of Covid 19) घेतलेल्या पर्यटकांनाच (Tourist) लोणावळ्यात प्रवेश दिला जाणार आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. खासकरून पुणे (Pune) आणि मुंबईमधून (Mumbai) येणाऱ्या पर्यटकांनी ही नवी नियमावली समजून घ्यायला हवी.
महाराष्ट्रातील (Maharashtra) ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये (Patients of Omicron) वाढ (Growth) होत आहे. खासकरून पुण्यामध्ये ही संख्या वाढल्याचं दिसत आहे. लोणावळ्यामध्ये ख्रिसमस तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी प्रशासनाने ही काळजी घेतल्याचं दिसत आहे. याबाबत सीताराम दुबल (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर) आणि सोमनाथ जाधव (मुख्याधिकारी, लोणावळा पालिका) यांनी संयुक्तरित्या पर्यटकांसाठी (tourist) हे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केवळ लसीचे (vaccine) दोन डोस पुर्ण झालेल्यांनाच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पथकाच्या माध्यमातून लोणावळ्यात (lonavala) येणा-यांचे दोन डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र बघितले जात आहे.