10 विकेट्स घेतल्यानंतरही टीममध्ये जागा नाही, निराश एजाझ पटेलनं केली ‘ही’ मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ डिसेंबर । न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) टीम इंडिया विरुद्ध एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतरही पटेलला न्यूझीलंड टीममध्ये जागा मिळालेली नाही. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी (New Zealand vs Bangladesh) निवडण्यात आलेल्या टीममध्ये पटेलचा समावेश नाही. हे असं का झालं याची पटेलला जाणीव आहे. पण, त्याचबरोबर तो या निर्णयामुळे निराश झाला आहे. निराश झालेल्या पटेलनं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं महत्त्वाची मागणी केली आहे.

न्यूझीलंडमधील एका वेबसाईटशी बोलताना पटेल म्हणाला की, ‘न्यूझीलंडमधील आगामी पिढीला स्पिन बॉलिंगकडे वळण्याची प्रेरणा मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एक स्पिनर म्हणून या ग्राऊंडवर जे करणे शक्य आहे ते करण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे पिच बनवणाऱ्या स्टाफलाही न्यूझीलंडमध्ये स्पिन बॉलिंगला मदत करणारी पिच तयार करावी वाटतील. न्यूझीलंडमधील परिस्थितीमध्ये हे थोडं अवघड आहे. तरीही या पिचवर त्याच उत्साहात बॉलिंग करणे हे माझे काम आहे, असे पटेलने स्पष्ट केले.

न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले की, ‘एजाझ पटेलनं भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यानंतरही त्याला टीममध्ये जागा नाही, हे पाहून तुम्हाला विचित्र वाटेल. पण, आमचा नेहमीच परिस्थितीचा विचार करून टीम निवडण्यावर भर असतो. आम्हाला आता बांगलादेश विरुद्ध आमच्या देशात टेस्ट सीरिज खेळायची आहे. या सीरिजमधील प्लेईंग 11 मध्ये त्याचा समावेश होणे अवघड होते.’

न्यूझीलंडची टीम: टॉम लॅथम (कॅप्टन), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, रचिन रविंद्र, काइल जेमिसन, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि नील वॅगनर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *