महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियनमधील पहिली कसोटी टीम इंडियाने 113 धावांनी जिंकली आहे. या सामन्यात आफ्रिकेसमोर 305 धावांचे लक्ष्य होते, त्याच्या प्रत्युत्तरात संघ केवळ 191 धावा करू शकला आणि सामना गमावला. सेंच्युरियन येथे भारताचा हा पहिलाच कसोटी विजय आहे.
या विजयासह विराट अँड कंपनीने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सेंच्युरियन हे 56 वे मैदान आहे जिथे टीम इंडियाने कसोटी सामना जिंकला आहे. यासह भारताने मैदानावर सर्वाधिक कसोटी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने सर्वाधिक 77 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून शमी आणि बुमराहने प्रत्येकी 3 बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विननेही प्रत्येकी दोन बळी घेतले. शमीने संपूर्ण सामन्यात 8 विकेट घेतल्या.
आफ्रिकेच्या भूमीवर भारताचा हा सलग दुसरा कसोटी विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये संघाने जोहान्सबर्ग येथे खेळलेली शेवटची कसोटी 28 धावांनी जिंकली होती.
दोन्ही संघ-
IND: केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
SA: डीन एल्गर (कॅप्टन), एडेन मार्कराम, कीगन पीटरसन, रायसे व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बाउमा, क्विंटन डी कॉक (विकेटकीप), विआन मुल्डर, मार्को जेन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.