महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर । राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली कोविड टास्क फोर्सची (Covid19 task force) बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज किंवा उद्या निर्बंधांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. (CM Uddhav Thacekray will decide on restrictions today or tomorrow Info by Rajesh Tope)
टोपे म्हणाले, “टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये संसर्ग रोखण्यासाठी कोणते उपाय किंवा निर्बंध आणावेत याबाबत सविस्तर चर्चा झाली. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आज किंवा उद्या घेतील. हॉल, गर्दीची ठिकाण टाळलीच पाहिजे, हा एकंदर आजच्या बैठकीचा सूर होता”
चाचण्यांबाबतचा निर्णय, SGTF कीटचा वापर वाढवणार
चाचण्या कशा कराव्यात हा एक मुद्दा बैठकीत चर्चिला गेला. यामध्ये एसजीन टार्गेट फेल्युअर म्हणजेच SGTF हे जे कीट आहे, यामाध्यमातून ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संसर्गाचा खुलासा होतो. हे कीट येत्या दहा पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणावर वापरावं. तसेच आता जे पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत यामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे किती आहेत? याचं या SGTF कीटमधून होतं. ओमिक्रॉनच्या रुग्णांची टक्केवारी यातून आपल्याला कळू शकेल.
उपचारांबाबतचा निर्णय
उपचारांबाबत यावेळी चर्चा झाली. यामध्ये मोलिनुपिराविर या अँटिव्हायरल टॅब्लेटची योग्य प्रमाणात खरेदी व्हावी तसेच त्याचं वाटपही योग्य प्रमाणात व्हावं. गेल्यावेळी रेमडेसेविरसाठी जो त्रास झाला तसा होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.
लसीकरणाबाबतचा निर्णय
त्याचबरोबर लसीकरणाबाबत जो निर्णय झाला त्यामध्ये केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला परवानगी दिली. पण या मुलांचं लसीकरण शाळेत न करता लसीकरण केंद्रावरच क्लिनिकल टूर काढून करण्याबाबत निर्णय झाला. याद्वारे लसीकरणाला गती देण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली. राज्याच्या सरासरी लसीकरणाच्या मागे असलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगानं लसीकरण राबवण्याचा निर्णयही यावेळी झाला.