महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान (Sindhudurg District Central Cooperative Bank Election) जिल्ह्यात राजकीय धुमशान पहायला मिळालं. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा आजवरचा इतिहास पाहायला मिळाला, काही मतदार गायब असल्याचे प्रकर्षाने जाणवले. तर जिल्हा बँकेतील उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) हे संतोष परब यांच्या हल्ल्यातील कटात सामील असल्याच्या आरोपात संशयित असल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले. न्यायलायाकडे मतदानासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावनी करताना न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम जमीन अर्ज न्यायालायने फेटाळला. (Sindhudurg District bank election updates)
किती टक्के झाले मतदान ?
या मतदान प्रक्रियेत एकूण 98.67 % मतदान झाले असून तालुकानिहाय कुडाळ- 213 पैकी 213 – 100 % , वेंगुर्ले – 96 पैकी 91 – 94.79 %, सावंतवाडी – 212 पैकी 211 – 99.52 %, वैभववाडी 54 पैकी 13 – 98 %, कणकवली – 165 पैकी 161 – 97.57 %, मालवण – 110 पैकी 110 – 100 % दोडामार्ग – 48 पैकी 48 – 100 %, देवगड – 98 % मतदान झाले.
बहुमताचा आकडा कोण गाठणार?
ही निवडणूक राणे आणि शिवसेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली. काल सकाळी 7 वाजता सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया 4 वाजता संपली. सकाळी 9 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालायत मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूकिच चित्र स्पष्ट होईल. 19 जागांपैकी 10 चा आकडा हा बहुमतांचा असून कोण बाजी मारत हे चित्र आज स्पष्ट होईल.
याआधी कुठल्या पक्षाची सत्ता किती जागा कुणाकडे?
2008 पासून बँक राणेंच्या अधिपत्याखाली आहे. एकूण 19 जागांसाठी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या.
सध्या कुठले पँनल निवडणुकीच्या रिंगणात?
महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत.
एकूण किती जागासाठी निवडणूक?
एकूण 19 जागांसाठी निवडणूक
एकूण 39 उमेदवार रिंगणात
निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा पणाला ?
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा लागली आहे.