12
महाराष्ट्र 24 ; नागपूर – कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिक महागडे सॅनिटायझर खरेदी करत आहेत तर N-95 मास्क खरेदी करत आहेत. मात्र महागडे सॅनिटर आणि मास्क खरेदी करण्याची गरज नाही, असं म्हणत नागपुरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वसामान्यांना सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे निश्चित काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र मास्कच्याऐजवी रूमालाचा वापर केला तरी फायद्याचं ठरेल आणि सॅनिटायझरऐवजी साबणाने जरी स्वच्छ हात धुतले तरी चालेल, असं त्यांनी सांगितलं आहे.
वारंवार साबनाने हात स्वच्छ करा. घरबसल्या काम करा. इथून पुढचे थोडे दिवस घराबाहेर पडू नका, स्वत:ची काळजी घ्या आणि तंदुरूस्त रहा, अशा सोप्या टिप्स त्यांनी नागरिकांना दिल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्ताचा आकडा 42 वर गेला आहे. मुंबईत 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.