महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) खाजगी कंपन्यांना टक्कर देत आहे. BSNL ने असे अनेक प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत जे एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया या खाजगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांपेक्षा अनेक चांगले प्लॅन्स ऑफर केले जात आहेत.
BSNL चा 499 प्रीपेड प्लॅन
या BSNLच्या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा दिली जात आहे. या प्लॅनची वैधता ९० दिवसांची असून या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत मेसेज देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये तुम्ही दिल्ली आणि मुंबईच्या MTNL वापरकर्त्यांना मोफत अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला BSNL Tunes ची सुविधा देखील मिळेल
एअरटेल ऑफर
एअरटेल कंपनीचा 359 रुपयांचा प्लॅन बेसिक प्लॅन मानला जाऊ शकतो. यामध्ये कंपनी तुम्हाला दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100 SMS देते. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. जेव्हा तुम्ही कंपनीच्या थँक्स अॅपद्वारे हा प्लॅन घेता, तेव्हा तुम्हाला तो फक्त 309 रुपयांमध्ये मिळेल आणि त्यासोबत तुम्हाला 2 GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल जो तुम्ही कधीही रिडीम करू शकता.