दहावी-बारावीची 1 फेब्रुवारीपासून पूर्व परीक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जानेवारी । बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना स्वत:च्या गुणवत्तेचा तथा शैक्षणिक प्रगतीचा अंदाज यावा आणि परिपूर्णरित्या बोर्डाची परीक्षा देता यावी, या हेतूने दरवर्षी मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून दरवर्षी सराव व पूर्व परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे (Corona) शाळा-कॉलेज (School-college) उशिराने सुरु झाले आणि बहुतेक शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. त्यामुळे यावर्षी केवळ दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षाच (Pre examination) घेतली जाणार आहे. 1 ते 10 फेब्रुवारी या काळात त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शहर-जिल्ह्यातील जवळपास 675 शाळा आणि 125 ज्युनिअर कॉलेज मुख्याध्यापक संघाचे सभासद आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या जवळपास साडेतीन लाख विद्यार्थ्यांची दरवर्षी चाचणी परीक्षा (Test examination) आणि सराव व पूर्व परीक्षा (Practice and pre-exam) मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून घेतल्या जातात. प्रत्येक विषयातील तज्ज्ञांची विषय संघटना स्थापन करून जवळपास 100 शिक्षकांच्या माध्यमातून दर्जेदार प्रश्‍नपत्रिका (Question paper) काढल्या जातात. त्याचा आजवर विद्यार्थ्यांना विशेषत: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यातून संबंधित शाळांना स्वत:च्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने तयारी करणेही सोयीस्कर झाले आहे. दरम्यान, कोरोनामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यासह राज्यभरातील शाळा 4 ऑक्‍टोबरपासून ऑफलाइन (Offline) सुरु झाल्या. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण सुरु होते, परंतु त्यात सर्वांनाच सहभागी होता आले नाही. त्यामुळे बहुतेक शाळांनी शिकवून पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाचा पुन्हा सराव घेतला. तर काही शाळांनी त्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन केले. त्यामुळे मुख्याध्यापक संघाच्या परीक्षांचे नियोजन पुढे गेले. 1 जानेवारीपासून सुरु होणारी सराव परीक्षा झाली नाही. आता 1 फेब्रुवारीपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा तर पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची द्वितीय चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *