उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । सोशल मीडियावर (Social media) दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, त्यापैकी असे काही व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतात की, जे आयुष्यभर आपल्या आठवणीमध्ये राहतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक हरिण (Deer) रस्त्याच्याकडेला उभे आहे. मात्र, तिथे खूप जास्त थंडी आणि बर्फ आहे. यामुळे हरिण पूर्णपणे गारठून गेले आहे. यामुळे या हरणाला त्रास देखील होत आहे.

https://www.instagram.com/memewalanews/?utm_source=ig_embed&ig_rid=c771f85d-bd1d-4ea4-802b-d16d3fca0342

हरणाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हरिण रस्त्याच्या कडेला एका जागेवर उभे आहे. मात्र, त्याच्या पायाजवळ आणि तोंडा जवळ बर्फ तयार झाला आहे. कारण तेथील तापमान उणे 56 आहे. त्यामुळे त्याला हालचाल देखील करता येत नाही. मात्र, त्यावेळी तिथे एक माणूस येतो आणि हरणाच्या अंगावरील बर्फ काढण्याचा प्रयत्न करतो आणि हरिण पळायला देखील लागते. मात्र, थोडे पुढे जाऊन परत हरणाच्या अंगावर बर्फ तयार होतो.

त्यानंतर तो माणून हरणाच्या अंगावरील बर्फ काढण्याचा प्रयत्न करतो. पण हरिण काही जागेवरून हालत नाही. हा व्हिडीओ कजाकिस्तानचा असल्याचे बोलले जात आहे आणि तेथील तापमान उणे 56 आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर memewalanews वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. कारण काही लोक या हरणासाठी स्वत: थंडीमध्ये बाहेर आले आहेत आणि हिरणाच्या अंगावरील बर्फ काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *