महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जानेवारी । नव्या वर्षात सोनं खरेदीसाठी चांगली संधी आहे. 2022 मध्ये सोन्याच्या दरात जवळपास 4 टक्के घसरण पाहायला मिळाली. आज वर्षाच्या पहिल्या सोमवारी सोने दरात काहीशी घसरण झाली. अमेरिकी ट्रेजरी यील्डमध्ये तेजी आल्याने जागतिक ट्रेंडचा सोन्याच्या किमतीवर आंशिक परिणाम दिसून आला.
आज MCX वर सोन्याचा वायदे भाव 0.19 टक्के 49 रुपयांच्या घसरणीसह 48,056 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदी 0.37 टक्के 230 रुपयांच्या घसरणीसह 62,430 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. जाणकारांच्या अंदाजानुसार, जगभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्याचा परिणामवरही सोन्यावर पाहायला मिळेल. कोरोना साथ आणि महागाईच्या भीतीने 2022 मध्ये सोनं 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. परंतु सध्या सोनं खरेदीची चांगली संधी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.